…….तरच अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण होणार ! सुजय विखेंच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : गेल्या महिन्यात अर्थातच मार्च महिन्यात शिंदे सरकारने एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. 13 मार्चला झालेल्या या बैठकीत शिंदे सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच नाव राजगड करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आता अहमदनगरच्या नामांतरणाचा विषय पटलावर आला आहे. खरेतर सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरु आहेत. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष आपले अधिकृत उमेदवारांसाठी मैदानात उतरले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात देखील महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. दरम्यान हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक सभा देखील घेतली गेली होती. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात अहमदनगरच्या नामांतरणाचा मुद्दा छेडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी, प्रचार सभेत बोलताना, ‘सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ होईल. मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिली आहे; पण दिल्लीची मंजुरी बाकी आहे, असे म्हटले आहे.

विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे : मुख्यमंत्री

या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी मविआच्या उमेदवाराला अर्थातच लंके यांना लंका असे म्हटले आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी या कार्यक्रमात सुजय विखे पराभूत होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी सुजय विखे यांचे मताधिक्य वाढवून त्यांना संसदेत पाठवायचे असून, विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे, असं म्हणतं विरोधी उमेदवार लंके सहित संपूर्ण महाविकास आघाडीवर हल्ला चढवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe