अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याबाबत तक्रार केली आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण होत असल्याचा आरोप या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

पत्रात चंद्रकांत शेळके म्हणतात की, अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक भरणार आहेत, आजपर्यंत अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही,

त्यामुळे अहमदनगर येथील शिवसेना संघटना बळकट राहिली, परंतु काही दिवसांपासून याठिकाणी जातीचे राजकारण सुरु आहे. या राजकारणातून अनिल राठोड यांना पराभूत केले होते,

आजही स्वीकृत नगरसेवकाच्या वेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच आपण यात लक्ष घालावं नाहीतर अहमदनगरची शिवसेना एकतर भाऊ कोरेगावकर आणि काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचं काम करुन राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देत आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घालावे, व अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24