अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर शेजारील बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीनं आणि दगडानं मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ बीडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.
सदर घटना शनिवारी संध्याकाळी बीड जिल्ह्यातील एका गावाक घडली. त्र्यंबक आणि शिवबाई खेडकर असं या दांपत्याचं नाव आहे. त्यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीत त्र्यंबक खेडकर हे गंभीर जखमी झाले असून
आई शिवबाई खेडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा हा मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे.रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, आईचा मृत्यू झाला आणि वडील कोमात गेले आहेत.
दरम्यान ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा मुलगा मनोरुग्ण असल्या करणाने कुणी पूढे जाण्याची हिम्मत केली नाही.
मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दैवं म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.
दरम्यान, बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असं काही ग्रामस्थांनी सांगितलं. त्याला मारहाण करताना थांबवण्यासाठी गेलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते.
याप्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही. मारहाण होत असताना वृद्ध मदतीची याचना करीत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र लोकांनी मध्यस्ती करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली.