अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊन चे संकट सुरु असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाने राज्यभरात पावसाचे संकेत दिले आहेत.रविवारी (ता.१०) अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली होती.
दरम्यान आजही पुढील तीन ते चार तासात वादळी वार्यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.हवेचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी वार्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेतीतील कामे वादळा अगोदरच उरकून घ्यावी. शहरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामध्ये अवकाळी पावसानं झोपडल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.पुढचे 5 दिवस मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आधीच कोरोनाचा संकट आहे त्यामध्ये हवामानातील होणाऱ्या बदलामुळे व्हायरलचं संकट ओढवू शकतं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®