अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाविकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आता मात्र पालकमंत्रिपद कोणाला भेटतेय हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहमदनगरच्या पालकमंत्रिपदावरून चांगलीच चुरस असल्याचे समोर येत असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना यापैकी कोणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जाईल हे लवकरच समजणार आहे.
दरम्यांन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा ना.दिलीप वळसे पाटील इच्छुक असल्याची चर्चा आहे.
नगर जिल्ह्याबद्दल ना.वळसे यांनाही आत्मियता आहे. त्यामुळे ते आग्रह धरून पक्षाकडून पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपल्याकडे घेतील, असा अंदाज वर्तविला जातो.
आघाडी सरकारच्या काळात परंपरेने राष्ट्रवादीकडे नगरचे पालकमंत्रिपद होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकार मध्येही हे पद राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यात राजकीय ताकद मोठी असल्याने राष्ट्रवादी पालकमंत्रीपद सोडणार नाही, असा विश्वास पक्षातील नेत्यांना वाटतो.
जिल्ह्यात पक्षाचे निम्मे आमदार आहेत. त्यामुळे हे पद पक्षाकडेच असावे, यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.