अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर होणार नाही ! कारण …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : महापालिकेचे पुढील अडीच वर्षासाठीचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून २०२१ रोजी संपणार आहे. 

त्यापुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.१३) दुपारी मुंबईत काढण्यात आली.

त्यानूसार नगर महापालिकेचेही आरक्षण जाहीर करण्यात आले आले असून महापालिकेचे पुढील अडीच वर्षासाठीचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गातील ५ नगरसेविका असून यामध्ये शिवसेनेच्या ३, कॉंग्रेसच्या १ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १ महिला नगरसेविकांचा समावेश आहे.

शिवसेकडून रिता भाकरे, रोहिणी शेंडगे, शांताबाई शिंदे . कॉग्रेस कडून शिला चव्हाण. व राष्ट्रवादी : रुपाली पारगे यांपैकी एका महिलेला महापौर पदाची संधी मिळू शकते

दरम्यान भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविकाच नसल्याने पुढील अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या रेसमध्ये भाजप असणार नाही. भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविकाच नसल्याने महापालिकेचे विद्यमान महापौरपद जरी भाजपकडे असले तरी पुढील अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या रेसमधून भाजपा ‘आऊट’ होणार आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24