अहमदनगरच्या निकिता पोटे हिची ‘मिस इंडिया’ म्हणून निवड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- येथील नामवंत माध्यम तज्ञ व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.विजयकुमार पोटे यांची पुतणी तसेच मुंबई पोलिसमध्ये असणारे संजयकुमार पोटे यांची कन्या कल्याण येथील निकिता संजयकुमार पोटे यांची राष्ट्रीय स्तरावरील ‘मिस इंडिया’ म्हणून निवड झाली आहे.

नुकत्याच गोवा येथे मिस इंडिया ग्लोबल 2020 टॅलेंटिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्यावतीने आयोजित स्पर्धेत निकिता हीने राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निकिताने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.

अंतिम फेरीत ती पहिल्या पाच स्पर्धकांमधून प्रथम चमकली, आता ती आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार आहे. यापूर्वी तिला इंडियाज् नेस्ट टॉप मॉडेल वेस्टर्न झोन-2019 (महाराष्ट्र) म्हणूनही गौरविण्यात आले. गेल्या वर्षीच्या स्टिलीया इंडिया ती पश्‍चिम क्षेत्राची विजेती आहे.

टॅलेंटिका ग्लोबल मिस इंडिया स्पर्धेसाठी तिला शिवा शरद क्रित, शुभम वर्मा, आई सौ.सविता पोटे आदिंचे मार्गदर्शन लाभले. केंद्रीय समाज कल्याण मंत्री ना.रामदास आठवले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वसंत जगधडे, जि.प. प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता पोटे, ज्येष्ठ समाजसेवक व्यसनमुक्ती चळवळ निसार मास्टर, नरेंद्र पोटे, दादासाहेब पोटे, शिवाजी कांबळे आदिंनी अभिनंदन केले आहे.

तिच्या या यशाने कल्याण व नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. निकिता ही कल्याण येथे राहत असून, तिचे वडिल मुंबई येथील कांजुर मार्ग पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेत.

निकिता ही शिवाजीराव एस जोंधळे पॉलिटेक्निकमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा विद्यालय, कल्याण येथे झाले आहे. तिचे आजोळ शेवगांवचे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24