अहमदनगरचे सुपुत्र तहसीलदार सुभाष यादव यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर  :- एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव(३१) यांचे आज सकाळी साडेदहा वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.

सुभाष यादव हे आलापल्ली येथे पत्नी व लहानग्या मुलासह वास्तव्य करीत होते. यादव यांना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविदाराचा झटका आला.

त्यांना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांना दुसरा झटका आला आणि काही क्षणातच त्यांचे निधन झाले.

सुभाष यादव हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी होते. ते २०१४ च्या तुकडीतील अधिकारी असून, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांची पहिली पदस्थापना झाली. त्या

नंतर १३ सप्टेंबर २०१९ रोजी ते एटापल्ली येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभाव आणि उत्तम प्रशासन यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24