महाराष्ट्र

अजय बारस्कर यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतलेत ? मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

Manoj Jarange Patil On Ajay Baraskar : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.

यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील चर्चेत आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांची अडचण वाढली आहे. त्यांच्यावर त्यांच्यासोबत राहिलेल्या सहकाऱ्यांनीच काही गंभीर आरोप केले आहेत.

काल अर्थातच 21 फेब्रुवारी 2024 ला पाटील त्यांच्या समवेत आंदोलनात सहभागी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत.

दरम्यान या आरोपावर उत्तर देताना जरांगे पाटील यांनी देखील बारस्कर यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी बारस्कर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

तसेच आज, 22 फेब्रुवारी 2024 रोजी जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकारांसमवेत बोलताना बारस्कर यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. यावेळी पाटील यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आड लपून आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

हा सरकारचा एक ट्रॅप असल्याचे त्यांनी सांगितले. अजय बारस्कर यांच्यासोबत आणखी दहा ते पंधरा माणसे असून ते मला बदनाम करत आहेत. त्यांना काहीही बोलू दे मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही असा घनाघात जरांगे पाटील यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मी उपोषण करत होतो त्यामुळे माझ्या तोंडून त्या दिवशी अनावधानाने तुकाराम महाराज यांच्या बद्दल शब्द गेला, यामुळे मी या आधीच याबद्दल माफी मागितली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उपोषण सुरू असताना बारस्कर यांनी मला पाणी पिण्याचा आग्रह धरला.

मला पाणी पाजून त्यांना मोठे व्हायचे होते. मात्र मी त्यांना तेथून हाकलून लावले. याच संतापातून माझ्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान यावेळी बारस्कर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटील यांनी त्यांना बावळटकर असे म्हणत आज त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

एवढेच नाही तर अजय बारस्कर यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतले असल्याचे मी ऐकले असल्याचे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. एकंदरीत त्यांनी बारस्कर यांनी त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप केला आहे.

शिवाय अजय बारसकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच हे एक ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बडा नेता आहे.

ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबलं गेलं आहे. ते प्रकरण उघडं करू नाहीतर तू जरांगेंच्या विरोधात बोल, असा दबाव त्याच्यावर आहे, तो आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येत होता.

आम्ही त्याला मानतही नाही, तो कोण आहे ते आम्हाला माहिती नाही अस देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

एकंदरीत सध्या जरांगे पाटील आणि अजय बारस्कर यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनात सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी देखील त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात असे वानखेडे यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office