श्रीगोंदा पंचायत समिती सभापतिपदी अजय फटांगरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- पंचायत समिती सभापतिपदाचा अतिरिक्त कार्यभार नगर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे विद्यमान सभापती अजय फटांगरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

नव्या सभापतीची निवड होईपर्यंत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार फटांगरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींमधून चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली.

श्रीगोंदा पंचायत समिती सभापती निवड करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

यासाठी जिल्हा परिषदेत कार्यरत विषय समिती सभापतींच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यानंतर यातून एक चिठ्ठी काढण्यात आली.

या नुसार श्रीगोंदा पंचायत समिती नवीन सभापती निवड होईपर्यंत कार्यभार अजय फटांगरे यांच्याकडे राहील, असे जाहीर करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24