अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान ह्या अचानक घडलेल्या घटनेमुळे अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली का हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याचं चित्र सध्या दिसत असून  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण अजित पवार यांनी जे केलं त्याबद्दल अनभिज्ञ असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी जे काही केलं ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक ट्वीट करत सांगितलं.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा अर्थ तुम्हीच समजा वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24