अजित पवारांना धक्का, जयंत पाटील यांना व्हिपचा अधिकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नाही. विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. 

या मुळे व्हिप बजावण्याचा अधिकार जयंत पाटील यांना असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या मुळे हा अजित पवार आणि भाजपाला मोठा धक्का मनाला जात आहे.
३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नव्हता.

अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सचिवालयाशी पत्रव्यवहार झाला. त्या मुळे आता व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटील यांना आहे. असे सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

भाजपच्या काही नेत्यांकडून सांगितले जात आहे की आमच्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. अजित पवार हे गटनेते म्हणून निवडले गेले असून  त्यांनाच पक्षाचा व्हिप बजवाण्याचा अधिकार आहे.

नव्या माहितीनुसार अजित पवार हे विधीमंडळ नेते नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे भाजपकडून करण्यात येणारा दावा फोल ठरला आहे.
अजित पवार यांना आता कोणतेही अधिकार नसल्याने ते व्हिप बजावू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अधिकृत विधिमंडळ नेते हे जयंत पाटील आहेत, हे विधिमंडळाच्या सचिवालयात लेखी नोंद असल्याने त्यांनाच व्हिपचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे अजित पवार आणि भाजपच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
अहमदनगर लाईव्ह 24