अजित पवारांनी एका रात्रीत पाप केलं !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना भाजप – राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले.

या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केला.

‘अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा फासली आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. पण आमच्या नजरेला नजर लावून बोलत नव्हते. नंतर ते अचानक गायब झाले. हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यांचा फोन नंतर बंद होता.

ते वकिलाकडे बसले होते असं कळत होतं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते हे आता कळालं. शरद पवारांचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही हे मी सांगू शकतो.

शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण बदललं. त्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंत खंजीर खुपसला. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला आहे.असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24