मुंबई : अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांना अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. पण त्यावेळेस या तीनही नेत्यांना अपयश आलं होतं.
आता या सगळ्याध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समजते आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होऊ शकते. त्यांच्या या भेटीबाबतची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस हे देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज दुपारी साडे तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार असून, त्यातच ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.