अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी व्यक्त केली.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी संत लूक रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा ग्रामीण रुग्णालय व साखर कामगार रुग्णालयाला पीपीई कीट व अँटीजन टेस्टिंग कीट देण्यात आले. याप्रसंगी आदिक बोलत होत्या.
पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी लवकरच मुख्यमंत्रिपद भूषवावे, असे आदिक म्हणाल्या. राजकीय गोटात त्यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com