पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर….अजित पवारांची धमकी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला.सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

या सर्व घटनेनंत सकाळी उद्धव ठाकरे यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांचा हा वैयक्तीक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने त्यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली

अजित पवारांची समजूत काढण्यात अपयश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले. अजित पवारांचं मन वळवण्यासाठी हे तिन्ही नेते अजित पवारांच्या घरी दाखल झाले होते मात्र, हे तिन्ही नेते माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता पुन्हा परतले.

पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर…

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला असा निरोप अजित पवार यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या आमदारांमार्फत शरद पवार यांना पाठवला आहे.

दरम्यान, सध्या वाय. बी. चव्हाण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. यावेळी अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार परतल्याचे पाहायला मिळाले.

अहमदनगर लाईव्ह 24