अजितदादा म्हणाले कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं, काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलंय.

मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत.

आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असं सांगतानाच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला.

कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.

अहमदनगर लाईव्ह 24