चमकेगीरी करणाऱ्या आमदारांनीच मोडला जमावबंदी आदेश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले :- शहरातील बसस्थानक परिसरातील हाॅटेल सम्राट येथे शिवभोजन थाळीचा उपक्रम रविवारी सकाळी सुरू करण्यात आला. लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांना व गरजूंना पाच रुपयांत येथे जेवण मिळणार आहे.

या शिवभोजन थाळीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते झाले. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश धाब्यावर बसवण्यात आला.

तसेच महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रमातही नियमांना केराची टोपली दाखवत कार्यक्रम घेण्यात आला. शिवभोजन थाळीच्या उद््घाटनप्रसंगी अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ,

शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक महेश नवले, प्रदीप हासे, गणेश कानवडे, अकोले नगरपंंचायतचे नगरसेवक प्रमोद मंडलिक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले,

भाजपच्या व्यापारी सेलचे शहराध्यक्ष अनिल कोळकर, हेमंत दराडे, संदीप शेणकर, महेश तिकांडे, बाळासाहेब धुमाळ, शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणारे नीलेश दिवटे,

जाकिर सय्यद, पराग कोळकर, अरुण ढेकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उद्घाटनाला हजेरी लावली होती. रविवारी अवघ्या तासाभरात सुमारे १०० लोकांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24