अकोले विधानसभा मतदार संघात मात्र पिचड फॅक्‍टरच प्रभावी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले :- विधानसभा मतदारसंघात पिचड पिता-पुत्रांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत कायम टिकून राहिला असल्याचे निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांत ‘विखे फॅक्‍टर’ प्रभावी ठरला असताना अकोले विधानसभा मतदार संघात मात्र पिचड फॅक्‍टरच प्रभावी ठरला.

अकोले विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 81 हजार 165 मते मिळाली तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना 49 हजार 514 मते मिळाली.

अकोल्याचे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना 10 हजार 400 मते मिळाली. अकोले तालुक्‍याने आ. कांबळे यांना 31 हजार 651 मतांची भरघोस आघाडी दिली.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची यंत्रणाही त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये मताधिक्‍यकामी कमी पडली.

संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे या ठिकाणी युतीला मोठे बळ मिळाले. “मोदी लाटे’त व त्याला जोडून “विखे फॅक्‍टर’नेही या तालुक्‍यांमध्ये व विधानसभा मतदारसंघात आपला वरचष्मा गाजवला.

अहमदनगर लाईव्ह 24