अकोले :- इतक्या वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केले, त्यांना सोडून जाण्याचे दुःख होत आहे.
मात्र पुढील पिढीचे भवितव्य, तालुक्याचा विकास आणि आदिवासी समाजाचे प्रश्न कोण सोडू शकेल हा विचार करूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला,
अशी भावना राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी चे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 17 ऑगस्टच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी तालुक्यातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.