अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे या युवकाने एक व्हिडीओ टाकत शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला होता.
या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला तर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला. याप्रकरणी आता साखर कारखान्याचे चेअरमन व मारहाणीचा आरोप असणाऱ्या सत्यशील शेरकर यांनी आपली बाजू मांडत हे मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणतात ,
‘सध्या, आमच्या शिरवली गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह सर्वचजण लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात सुरक्षेसाठी गावात काम करत आहेत.
अक्षय बोराडे यांच्या घरातील शेडजवळ ४ ते ५ मनोरुग्ण आहेत. हे मनोरुग्ण दुपारी, रात्री, पहाटे केव्हाही बाहेर पडतात. विशेष म्हणजे या मनोरुग्णांची कुठलिही तपासणी केली नाही.
अद्यापही अक्षय हे मनोरुग्ण आणतच आहेत, ४ ते ५ दिवसांपूर्वी अक्षय यांनी मंचर येथून एक मनोरुग्ण गावात आणला. यासंदर्भात आम्हाला माहिती मिळाली, तसेच तो रुग्ण कोरोनासदृश्य असल्याचंही कळालं,
असे सत्यशील शेरकर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मंचरच्या त्या रुग्णालयातूनच फोन आला होता की, तो कोरोनासदृश्य रुग्ण आहे. त्यामुळे, त्या रुग्णाला पुण्याला हलविण्यात आले.
पुढे त्या रुग्णाचं काय झालं हे आम्हाला माहिती नाही, तो पॉझिटीव्ह होती की निगेटीव्ह हेही माहिती नाही. मात्र, पुढे गावात असं काही घडू नये, यासाठी आम्ही अक्षयला बोलावून घेतलं होतं.
त्यानंतर, या मनोरुग्णांची व्यवस्थित काळजी घे, गावाचीही काळजी घेणं आवश्यक आहे, असं आम्ही त्याला सांगितलं. मात्र, आम्ही त्याच्या कामावर आक्षेप घेतोय, असा समज त्याचा झाला.
त्यातून त्याने आम्हाला अरेरावीची भाषा केली, शिवीगाळ करत तो निघून गेला. त्यानंतर, फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ करुन त्याने आमच्यावर मारहाणीचे आरोप केल्याचं शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com