महाराष्ट्र

नगरच्या अक्षयचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर जिल्ह्यातील एका तरुणाचा पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे राहणारा तरुण अक्षय अरविंद फोपसे,वय पंचवीस वर्ष याचा पुण्यातील कोथरूड भागात कर्वे चौकामध्ये मोटरसायकलवर डिव्हायडरला आदळून मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,अक्षय हा एका आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता.गेल्याच आठवड्यात पुण्याकडे पुन्हा कामावर रुजू झाला होता.

त्याच्या बुलेट मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यावर बारीक खडी असल्यामुळे मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान गोंडेगाव येथे त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office