महाराष्ट्र

आला रे आला गणराया आला….; महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील सर्व शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान सुट्टी राहणार !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra School Holiday For Ganpati : श्रावण महिना संपल्यानंतर पहिला मोठा सण येतो तो गौरी-गणपतीचा. गणेशोत्सवाचा सण हा संपूर्ण राज्यभर मोठ्याउत्साहात साजरा होतो. हा उत्सव लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेजण मोठ्या आनंदाने सेलिब्रेट करता.

हा सण जन माणसांना एकत्रित आणणारा सण आहे. सर्व जाती-धर्माचे लोक या सणात हिरीरीने सहभाग घेतात. हा महाराष्ट्रातील जनतेचा श्रद्धेचा आणि एक सांस्कृतीक जिव्हाळ्याचा उत्सव आहे, जो की दरवर्षी मोठ्या धामधुमीत साजरा होत असतो.

यंदाही श्री चे आगमन मोठ्यात धामधूमीत होणार आहे. बाप्पाच्या आगमन झाले की दहा दिवस सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. अनेक जण नोकरी धंद्यासाठी, कामासाठी, शिक्षणासाठी बाहेरगावी असतात. मात्र ही बाहेरगावी गेलेली जनता गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे हमखास परतत असते.

मुंबई, नवी मुंबई मध्ये स्थायिक झालेली कोकणातील जनता देखील गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे जात असते. नवी मुंबई येथील बहुतांशी चाकरमानी व नागरिक गणेशोत्सवासाठी पाच ते सहा दिवस आपल्या पाल्यांसह कोकणात व इतरत्र आपल्या गावी जात असतात.

यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शाळांना सुट्टी असायला हवी. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र शासनाच्या सर्व शाळा आणि खासगी शाळांच्या जाहीर सुट्ट्यांच्या कार्यक्रमानुसार, शिक्षण विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पाच ते सहा दिवस सुट्ट्या जाहीर करणं आवश्यक आहे.

पण यावर्षी शिक्षण विभागाच्या माध्यमातून अजूनही याबाबतचे परिपत्रक काढले गेलेले नाही. यामुळे नवी मुंबई मनसेने नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात पत्र लिहून विनंती अर्ज केला होता. यानंतर महापालिकेने तात्काळ ॲक्शन घेतली आणि नवी मुंबई मधील शाळांना 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने हा निर्णय घेण्याबरोबरच महापालिका क्षेत्रातील सर्व पालिकेच्या शाळांसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांना गौरी-गणपतीनिमित्त सुट्टी देण्याचे निर्देश सुद्धा जारी केले आहेत.

Ahmednagarlive24 Office