महाराष्ट्र

शेतकऱ्याच्या लेकाची भन्नाट कामगिरी ! MPSC परीक्षेत मिळवला पहिला नंबर ; बनला पीएसआय

Published by
Ajay Patil

Beed News : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ काही शेकडो विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड होत असते. परिणामी या परीक्षेचं स्वरूप दिनोदिन कठीण बनत चालले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या डिपार्टमेंटल पीएसआय पदाचा निकाल 2 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला आहे. या डिपार्टमेंटल पीएसआय पदाच्या परीक्षेत अनेक शेतकरी पुत्रांनी बाजी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यांची मुलं एमपीएससी सारख्या कठोर परीक्षेत देखील मागे राहिलेले नसल्याचे चित्र उभे झाले आहे.

या 2022 च्या डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे नाकाडेवाडी येथील शेतकरी महादेव नाकोडे यांचा मुलगा भागवत महादेव नाकाडे याने देखील घवघवीत असं यश मिळवत आपल फौजदार बनण्याचा स्वप्न पूर्ण केल आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत भागवत राज्यात प्रथम आला आहे. भागवत यांना या डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेत चारशे पैकी 358 मार्क मिळाले आहेत.

निश्चित या शेतकऱ्याच्या लेकाने खऱ्या अर्थाने आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. भागवत यांनी केलेल्या या नेत्र दीपक कामगिरीची सर्व स्तरावरून दखल घेतली जात असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. भागवत खरं पाहता मुंबई पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून एक सप्टेंबर 2014 पासून कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनात सेवा बजावत असतानाच त्यांनी फौजदार बनण्याचं स्वप्न पाहिलं.

यासाठी त्यांनी स्वप्ननगरी मुंबईत राहून धकाधकीच्या जीवनात जिद्द व चिकाटीचा परिचय देत परीक्षेसाठी अहोरात्र काबाडकष्ट केले. अखेर, आपल्या जिद्दीच्या कष्टाच्या आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतकरी पुत्र भागवत फौजदार बनला आहे. भागवत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी येथे झाले असून माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी अश्वलिंग विद्यालय पिंपळवडी या ठिकाणी घेतल आहे.

पदवीचे शिक्षण त्यांनी नोकरीवर कार्यरत असतानाच पूर्ण केले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवीग्रहण केली आहे. स्वप्ननगरी मुंबई या ठिकाणी पोलीस शिपाई म्हणून सेवा बजावत असतानाच कठोर मेहनत घेऊन पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम येत भागवत यांनी आपले, आपल्या परिवाराचे, आपल्या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil