Maharashtra News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३६ कोटींची मालमत्ता असून कोणतीही चारचाकी गाडी नाही. अमित शाह यांच्याकडे अवघे २४ हजार रुपये रोख आहेत.
अमित शाह यांनी शुक्रवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाजपेयी, अडवाणींचा मतदारसंघ राहिलेल्या गांधीनगरमधून ते दुसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत.
उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली व पत्नीची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यानुसार शाह यांच्याकडे २० कोटींची जंगम तर १६ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. शाह यांच्यावर १५ लाख ७७ हजार लाखांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे २४ हजार १६४ रुपये रोख आहेत.
अमित शाह यांच्याकडे ७२ लाख किमतीचे दागिने आहेत. यांपैकी केवळ ८ लाख ७६ लाखांचे दागिने त्यांनी खरेदी केले असून उर्वरित दागिने वडिलोपार्जित आहेत. उत्पन्नांच्या स्त्रोतामध्ये त्यांनी खासदार म्हणून मिळणारा पगार,
घर-जमिनीच्या भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न, शेतीतील उत्पन्न आणि शेअर्सचे डिव्हिडंड यांचा समावेश आहे. अमित शाह यांच्या पत्नीकडे २२ कोटी ४६ लाख रुपयांची जंगम तर ९ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
त्यांच्यावर २६ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागांसाठी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात एकाच वेळी मतदान होणार आहे.