Amrita Fadnavis : ब्रेकिंग! अमृता फडणवीस यांना 1 कोटीच्या लाचेची ऑफर, गुन्हा दाखल..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amrita Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका डिझायनर महिलेने त्यांना एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांना वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून डिझायनर महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. अनिक्षा असे या फॅशन डिझायनरचे नाव आहे.

अमृता फडणवीस यांच्या संपर्कात ती आली होती. इव्हेंटमध्ये आपण डिझाईन केलेले कपडे अमृता फडणवीस यांनी घालावेत म्हणून ती अमृता यांच्या संपर्कात आली होती. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एका गुन्ह्यात मदत करण्याची गळ घातली.

अनिक्षाकडून वारंवार मदत करण्याची विनंती केली जात होती. त्याबदल्यात त्यांना एक कोटीची लाच देण्याची ऑफरही देण्यात आली. त्यामुळे या जाचाला कंटाळून अखेर अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस
ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला लाचेची ऑफर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही बुकींची माहिती द्या. त्या माध्यमातून पैसे कमावता येतील, असे तिने अमृता यांना सांगितले होते. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. याबाबत मेसेज आणि विडिओ देखील आहेत.