अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील चितळी येथील बी. जे. पेट्रोल पंपावरील मॅनेजरला तिघा लुटारूंनी लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
परंतु ग्रामस्थांसह पोलिसांच्या सर्कतेमुळे हे लुटारू ताब्यात आले आणि हा लुटण्याचा डाव फसला. पोलिसांनी शशिकांत साळुंके, रवीद्र लोखंडे, सलीम पठाण या तिघा जणांविरुध्द भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे लुटारु कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व शिर्डी येथील आहेत. अधिक माहिती अशी: काल दुपारच्या दरम्यान राहाता तालुक्यातील चितळी येथील पेट्रोल पंपाचे मॅनेजर अक्षय घनशाम जाधव हे पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम
बॅगेत घेवून महाराष्ट्र बँकेत भरणा करण्यासाठी मोटारसायकलवरुन चालले होते. दरम्यान तिघांनी त्यांच्याकडे असलेली पैशाची बॅग हिसकावून धूम ठोकली.
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकरराव चौधरी यांना ही माहीती कळताच त्यांनी त्या लुटारुंचा पाठलाग केला. मात्र हे लुटारु जळगाव येथील चौधरी यांच्या उसाच्या शेतात जावून लपले.
यावेळी पोलीस पथकाने चौधरी यांच्या उसाच्या शेतात सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी या उसाच्या शेतात जावून या तिघा लुटारुंना शिताफीने पकडले.
व त्यांच्याकडून पोलिसांनी बँकेत भरणा घेवून जाण्यासाठी बॅगेत असलेली 1 लाख 68 हजार 470 रुपयांची रक्कम हस्तगत केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved