निराधारांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार,

श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

असून यांतर्गत राज्यातील जवळपास ३५ लाखांहून अधिक लाभार्थींना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित व ॲडव्हान्स स्वरुपात देण्यात येणार आहे.

राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तब्बल १२५७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, वित्त व नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24