अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचे संकट कायम असल्याने अद्यापही शाळेची दारे बंदच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात अद्यापही शाळा सुरु करण्यात आलेल्या नाही.
विद्यार्थयांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी चक्क पालकांसाठी ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आली आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुळे घरीच अभ्यास करीत आहे. मुलांच्या ऑनलाइन शाळा बहुतेक ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. या मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, हा पालकांच्या पुढे मोठा यक्ष प्रश्न आहे.
अनुभवी शिक्षकाविना मुलांचा अभ्यास घेणे हे पालकांना अत्यंत जिकिरीचे वाटत असते. नेमकी हीच गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते कैलास लोंढे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये सोशल मीडियावर पालकांसाठी वेबसाईटची निर्मिती करुन ऑनलाइन शाळा सुरू केली आहे.
या ऑनलाईन शाळेला नागपूर, पुणे, सातारा, सांगली, ठाणे व मुंबई अशा सर्व विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ऑनलाइन शाळेचे औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन शाळेमधून पालक आपल्या मुलांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करतील
आणि स्वतःसुद्धा एक आदर्श पालक म्हणून, कृतिशील पालक म्हणून समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतील, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली. आठवड्यातून एकदा झूम मिटिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधून मुलामुलींच्या समस्यावर उपाय सापडवता येणार असल्याचे उपक्रमाचे प्रमुख कैलास लोंढे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर दोनच सत्रांमध्ये मला मुलांचा अभ्यास कसा घ्यावा याचे तंत्र समजले. हा अभ्यासक्रम पालकांसाठी खूपच उपयुक्त असून प्रत्येक पालकाने याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved