अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-गावातील लोक आणि तरुण मंडळी हे रोजगार वा इतर कामानिमित्त शहरात येतात. उत्सुक असलेल्या अश्यांना शहरातील ठिकाणांचे नाव माहित असते
पण वाट चुकल्याने ते ह्या शहरी वातावरणात कावरे बावरे होतात आणि लुबाडले जातात. अशीच घटना पुण्यातील बुधवार पेठेतील दाणी आळीत गावाहून आलेल्या गृहस्थासोबत घडली.
गावाकडून आलेल्या एकाला जबरदस्तीने मिठी मारुन त्याच्या खिशातील २६ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. याप्रकरणी एका ४५ वर्षीय गृहस्थाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गावाकडून आलेल्या एकाला जबरदस्तीने मिठी मारुन त्याच्या खिशातील २६ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.
याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या गृहस्थाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धानोरा येथील राहणारे आहेत. ते शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बुधवार पेठेतील दाणी आळीमधून पायी जात होते.
तेथील नवी बिल्डिंगसमोर ते आले असताना आरोपी फिर्यादीच्या जवळ आले. त्यांनी गावाकडून आला आहे काय?, असे म्हणून त्यांचा हात पकडला.
जबरदस्तीने मिठी मारुन फिर्यादीच्या पँटच्या खिशातील पाकीट व त्यामध्ये असलेले २६ हजार रुपये चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.