कोरोनाग्रस्त गावात प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि देशभक्त जवान मदतीसाठी ग्राउंडवर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  सध्या महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यावर अनेक उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु तरीही संक्रमणाचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे.मुंबई , पुणे या ग्लोबल सिटी मध्ये तर रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. 

त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील प्रशासन व वैद्यकीय सुविधांवर ताण पडत आहे.परंतु ही बाब लक्षात घेऊन मातृभूमीच्या सदैव रक्षणार्थ काम करणारे सैनिक मात्र आपली जबाबदारी सार्थ पार पाडताना दिसत आहेत.

ड्युटीवर असो वा नसो हे देशभक्त जवान नेहमीच आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. असाच एक कौतुकास्पद प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील बुरूडगाव येथे घडला आहे.बुरूडगाव येथे कोरोनाचे काही रुग्ण आढळले. परंतु ही साखळी अल्पावधीतच वाढून हा रुग्णसंख्येचा आकडा जवळपास २१ वर जाऊन पोहोचला.हे गाव कंटेनमेंट जाहीर झाले.

परंतु प्रशासनावर आधीच बराच ताण असल्याने या गावात पोलीस किंवा इतर अधिकारी आले नाहीत किंवा त्यांनी दखल घेतली नाही. लोकांच्या प्राथमिक, इमर्जन्सी गरज कशा पूर्ण होणार हा प्रश्न गावाला पडला.तसेच कोणाचा धाक नसल्याने कंटेन्मेंटचे किती प्रमाणात नियम पळाले जातात याबाबत साशंकता होतीच. परंतु हि संकटाची घडी ओळखून गावातील काही निवृत्त जवान पुढे आले.

त्यांनी ग्रामपंचायतीच्या संमतीने स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली. गावासाठी हे जवान आपला पोशाख घालून गावाच्या रक्षणार्थ उभे ठाकले आहेत.गावातील लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपले मोबाईल नम्बर दिले असून ते स्वतः या गरज भागवत आहेत. विलास दरंदले, सी.बी.कापसे,संजय फुलारे,देवराम घोगरे,

शंकर कोतकर,विष्णू जाधव, गुलजार शेख,विजय कदम आदी जवान या कार्यासाठी पुढे आले आहेत. ते पुन्हा एकदा आपला मिलेट्रीचा पोशाख घालून गावासाठी कार्यतत्पर झाले आहेत.तसेच ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच,सर्व सदस्य,जालिंदर वाघ, रवींद्र ढमढेरे आदींसह ४० लोक गावाच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत. या कार्याचे प्रशासनाकडूनही कौतुक होत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24