Maharashtra News : ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवारांच्या या वक्तव्यावर सुनेत्रा पवार यांना विचारल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले.
अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार यावरून तुम्हाला यावर काय बोलायचे, असे विचारण्यात आले होते. या वेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली.
या सभेत अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असे आवाहन केले होते. त्यावर शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता. शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी केलेले आवाहन चुकीचे नाही.
मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी बाहेरून आलेले पवार, असा उल्लेख करताच पत्रकार परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सोबतच शरद पवार यांनाही हसू आवरले नसल्याचे पाहायला मिळाले होते.