अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव :- येथील कोर्टात आपल्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून अंगणवाडीसेविका व तिच्या पतीला भावकीतील पाच जणांनी मारहाण केली.
अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पढेगाव चौकी येथे राहणाऱ्या रेखा सतीश भारूड यांना आरोपी यांनी आमच्याविरुद्ध कोर्टात दाखल केलेला गुन्हा कोर्टातून मागे घ्या,
या कारणावरुन आरोपी मिलिंद बबन भारूड, नितीन बबन भारूड, दीपक बबन भारूड, मैना बबन भारूड, किरन निलीद भारूड (सर्व रा. पढेगाव चौकी)
यांनी संगनमत करून फिर्यादी व तिच्या पतीला लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने, बॅटने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून सोमवारी गुन्हा दाखल केला.