‘अनिल भैया खरोखर तुमची उणीव भासते, शिवसेनेने घेतली आज माघार’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला.

मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. याच वेळी शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.

मात्र, गाडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, या प्रकारानंतर ‘शिवसेना नगर’ या फेसबुक पेजवर ज्या पद्धतीने या निवडणुकीबाबत पोस्ट करण्यात आल्या आहेत,

त्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वरिष्ठाच्या निर्णयानुसार ही माघार घेतली असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले होते.

मात्र, त्यातच या सभापती निवडीपासूनच ‘शिवसेना नगर’ या फेसबुक पेजवर या निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या पोस्ट सुरू झाल्या आहेत.

* काय होतंय व्हायरल या पेजवर ? :- ‘अनिल भैया असले असते… तर माघार घेण्याची वेळ आली नसती. स्थायी समिती सभापती शिवसेनेची माघार.. अभिनंदन,’ ही पोस्ट केल्यानंतर लगेच या फेसबुक पेजवर माजी मंत्री अनिल राठोड यांचा फोटो टाकून ‘तुमची कमतरता खरोखर आज भसते, शिवसेनेने घेतली आज माघार…

’ अशी पोस्ट करण्यात आली. त्याचसोबत ‘महाविकास आघाडीच्या नावाखाली पुढचा महापौर सुद्धा राष्ट्रवादीचा होणार असे डिकलएर करून टाकावा,’ ‘उद्या काही शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे पंचे घालून दिसले, जास्त विचार करू नये हे तर आता होतच राहणार,

’ ‘खऱं दुःख तर तेव्हा वाटतं, जेव्हा आयुष्यभर एखाद्याला आपण त्यांच्या गुणामुळे विरोध करतो व एखाद दिवशी त्यांच्याच मांडीला मांडी लावून, हो हो म्हणायची वेळ येते. कटू आहे पण सत्य आहे. नगरचा राम गेल्याने हे होणारच होत, जय महाराष्ट्र,’ अशा विविध पोस्ट या फेसबुक पेजवर दिसू लागल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24