अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी अहमदनगरकरांच्या दिवसाची सुरवात माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन ही बातमी वाचून झाली. तब्बल 25 वर्षे नगर शहराचे आमदार राहिलेले राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाने नगरमधील शिवसेना शोकमग्न झाली आहे. अनिल राठोड यांच्यावर सकाळी अमरधाममध्ये अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. अनिल राठोड यांच्या अशा जाण्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांत शोककळा पसरली आहे.
शिवसेनेचा नगरमधील आक्रमक चेहरा, शिवसेनेचा ढाण्यावाघ अशी राठोड यांची ओळख होती. त्यांनी नगरमधून शिवसेनेचं २५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं होतं.त्यामुळेच शिवसेनेने त्यांना राज्यात मंत्रीपद दिलं होतं.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved