अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
अहमदनगर शिवसेनेचा ‘आव्वाज’ आज पहाटे काळाच्या पडद्याआड गेला. माजीमंत्री आणि अहमदनगर शहरावर गेली २५ वर्षै ज्यांनी आमदारकीच्या माध्यमातून अधिराज्य गाजवलं, अशा माजी मंत्री अनिल राठोड यांचं आज पहाटे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते.
‘भैय्या’ या नावाने परिचित असलेल्या माजी आ. राठोड यांनी अहमदनगर शहरातल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी संघर्ष केला. वेळप्रसंगी रस्त्यावर बसून प्रशासनाकडून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला.
त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने अहमदनगर शहर शिवसेनेवर शोककळा पसरलीय. अहमदनगरच्या चितळेरोडवरच्या ‘शिवालया’त यापुढे ‘अनिल भैय्या’ यापुढे कधीच भेटणार नाहीत, या विचाराने कडव्या शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved