अंकिता लोखंडेचे बॉयफ्रेंडसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल ; चाहत्याने ‘अशा’ कमेंट्स करत केले ट्रोल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  अंकिता लोखंडे सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सोशल मीडियावर सतत रोमँटिक फोटो पोस्ट करत असते.

विकी बरोबर दिवाळी साजरी करताना तिने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आणि लिहिले की, तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

अंकिताचे हे सेलिब्रेशन सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांना फारशे आवडले नाही. अंकिताला ट्रोल करताना ट्रोलर्सनी अंकिताच्या पोस्टवर अनेक कमेंट पोस्ट केल्या आहेत.

चाहत्यांमधून ‘ह्या’ आल्या कमेंट्स

  • – एका यूजरने लिहिले की, तुम्ही सुशांतला विसरलात का?
  • – दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत?
  • – ‘सुशांत को दिल में हमेशा रखना, भूलना मत’ अशीही एक कमेंट आली आहे.
  • – अंकिताच्या पोस्टवर एका सोशल मीडियाने लिहिले, अंकितासुद्धा सुशांत सरांना विसरल्याचे दिसते, नाटक चांगले करतेस.
  • – अंकिताला आनंदी पाहून एका युजरने कमेंट केली, हॅप्पी दिवाळी मॅम, पण तुम्हाला पाहून सुशांत सरांची आठवण येते.

सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर विकीशी जोडली गेली अंकिता :- सुशांत आणि अंकिता 6 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते पण 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.

काही वर्षानंतर मुंबईचा उद्योजक विकी जैन अंकिताच्या आयुष्यात आला. अंकिता अनेकदा विकीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. या वर्षाच्या अखेरीस दोघांनी लग्न करण्याचे ठरवले असल्याचे वृत्त आहे.

14 जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला :- 14 जून 2020 रोजी सुशांतचे मृत शरीर त्याच्या अपार्टमेंटमध्ये सापडले तेव्हा खळबळ उडाली होती. पोलिसांनी प्रथम सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून संबोधित केले पण नंतर त्याचा मृत्यू संशयास्पद मानून सीबीआय चौकशी सुरू केली.

या प्रकरणात अनेक धक्कादायक वळणे आली आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांना तुरुंगात जावे लागले. सुमारे 28 दिवस तुरुंगात घालविल्यानंतर तिला आता जामिनावर सोडण्यात आले आहे, परंतु सीबीआय अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24