संतापजनक! कॉलेजच्या विद्यार्थिनीवर प्राचार्याकडूनच अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर शहरातील वामनराव इथापे डी फार्मसी कॉलेजच्या प्रॅक्टीकल रुममध्ये चक्क प्राचार्यानेच आपल्या विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 13 रोजी समोर आला आहे.

या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन मूळचा राहाता तालुक्यातील हसनापूरचा रहिवासी असलेल्या प्रा.आरशू पटेल याच्या विरोधात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, बीड जिल्हयामधून शिक्षणासाठी संगमनेर येथे आलेल्याया विद्यार्थीनीस पटेल याने गेल्या नोव्हेंबरपासून त्रास दिलेला असून प्रॅक्टीकल रूम, क्लास रूम, तसेच स्वतःच्या दालनात बोलवून वारंवार अश्लील चाळे केलेे.तु शिक्षण कसे घेते, तु पासच कशी होते,

तुला नापास करील अशा धमक्यांमुळे धास्तवालेल्या या तरूणीने केवळ शिक्षणात खंड पडू नये यामुळे प्राचार्य पटेल याचा अन्याय निमुटपणे सहन केला.मात्र अतिरेक झाल्यानंतर मैत्रीणीस सांगून प्राचार्याच्या कृष्ण कृत्यांचा भांडाफोड केला. पटेल याच्यावर अ‍ॅट्रॅसिटी व छेडछाडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्राचार्याविरोधात रॅगिंगचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आग्रह मागणी महिलांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा विदयार्थीनीस न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी आय टी सेल चे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे यांनी दिली आहे.

या महाविद्यालयात अशा प्रकारे विद्यार्थीनींचे शोेषण होत असेल तर अशा महाविद्यालयांना टाळे ठोकून मान्यता का रद्द करू नये. असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे काही संघटनांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24