अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकटाकाळातही रुग्णांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबरीने जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे.
यामध्येच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे एका दलित मतीमंद महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, टाकळीभान येथील मतीमंद महिला (वय 62) ही हरेगाव येथून टाकळीभानला घरी येत असताना
कोंबडवा ते कांबळे वस्ती या दरम्यान एका अनोळखी इसमाने रस्त्यात अडवून रस्त्याच्या कडेला त्यांचा विनयभंग केला. तसेच लाथा-बुक्यांनी मारहाण केली. असे फिर्यादी महिलेने सांगितले आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्रे फिरवली.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना दोन चप्पल जोड, शर्टच्या गुंड्या, टॉवेल आढळून आला.
ज्या ठिकाणी हि घटना घडली या ठिकाणापासून जवळील गुळाच्या गुर्हाळात उत्तरप्रदेश, बिहार येथून आणलेल्या 13 मजूरांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस स्टेशन टाकळीभान येथे आणले.
श्वान पथकातील श्वानाला चप्पल, टॉवेल यांचा वास दिला असता या श्वानाने 13 जणांपैकी एकाला स्पर्श केल्याने सुंदर महिपाल कश्यप (वय 45) राहणार उत्तर प्रदेश या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे काँ. पवार करीत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved