संतापजनक! शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’चं काम;संघटना आक्रमक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-लॉक डाउनच्या काळामध्ये शिक्षकांना प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने विविध कामे करण्यास दिली होती. अगदी रेशन दुकानावरील नोंदीचे काम ते चेक पोस्टवर ड्युटी असे विविध कामे शिक्षकांनी केली.

परंतु आता बीडच्या शिक्षकांना किराणामालाची होम डिलिव्हरी देण्याचे काम देण्यात आल्याने संघटना आक्रमक झाली असून हे काम मागे घेण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.

पाटोदा तालुक्यातील 51 शिक्षकांना ‘डिलिव्हरी बॉय’ची कामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचण्याचे काम दिले आहे.

या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र शिक्षकांना असे काम देणे योग्य नाही.

हा निर्णय लवकरात लवकर मागे घेण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24