अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : डॉ. आंबेडकरांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानावर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे.
संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.
राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधलं होतं. बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ते म्हणाले राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी.