अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने चिंतेत टाकले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या हात तोंडाशी आलेले पीक अज्ञाताने हिरावून घेतले आहे.
संगमनेर तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकर्याच्या दीड एकर लाल कांद्यावर अज्ञाताने ‘रोगर’ नावाचे तणनाशक मारल्याने काढणीसाठी आलेला कांदा पूर्णतः वाया गेला आहे.
यामध्ये शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी मधुकर काशिनाथ जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माझे दीड एकर क्षेत्रावर दोन महिन्यांपूर्वी लाल कांद्याची लागवड केली होती.
कोरोना, अतिवृष्टी, अशा नैसर्गिक संकटांवर मात करीत कांद्याची मोठ्या हिंमतीने जोपासना केली. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी अज्ञाताने रोगर तणनाशक मारुन कांद्याचे पूर्णतः नुकसान केले.
यामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी, पोलीस पाटील व पुढार्यांनी कांद्याची पाहणी केली आहे. कांद्याचे गगनाला भिडलेले बाजारभाव यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच
या शेतकर्याचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन नुकसान ग्रस्त शेतकरी जाधव यांना प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved