कोरोनाची दुसरी लाट ‘त्सुनामी’ सारखी येण्याची शक्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, 

महाराष्ट्र धोकादायक वळणावर उभा आहे असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी थेट संवाद करताना दिला आहे. 

सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे असे सांगत त्यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचे आवाहनही केले आहे.

ते म्हणाले की, आता काळजी घेतली नाहीतर कुणीही वाचवू शकणार नाही. “मी तुमच्यावर नाराज आहे. बरेच लोक मास्क न वापरता फिरत आहेत. बाजारात अनावश्यक गर्दी करत आहेत.

आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल मुख्यमंत्र्यानी केला आहे.

संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडली आहेत.

चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचे संकट टळलेले नाही, तरुणांनो सावध राहा.असे आवाहन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24