अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षकपदी कोपरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले अनिल कटके यांची नियुक्ती झाली आहे.
अलीकडच्या काही वर्षांत तत्कालिन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीची उंची खूप वाढवली होती.
पवार हे पुणे ग्रामीणला बदलून गेल्यानंतर ही खुर्ची रिकामी होती. आता कटके यांच्या रुपाने अहमदनगर एलसीबीला कायमचे अधिकारी लाभले आहे.
आता पवार यांच्या तुलनेत कटके यांची कामगिरी कशी राहते, त्यांच्या कालखंडात किती गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात, दरोड्याच्या तयारीत असलेल्या किती टोळ्या जेरबंद केल्या जातात, याची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved