आपल्याला माहित आहे की,प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बँक व इतर अनेक पैशांच्या संबंधित महत्त्वाचे असलेल्या बाबींमध्ये बदल होत असतात. त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती तसेच बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये बदल केले जातात.
तसेच देशातील बँक देखील अनेक दृष्टिकोनातून महत्वाचे बदल किंवा निर्णय जाहीर करत असतात. अगदी अशाच पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेने घेतला असून तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर या कारणामुळे होऊ शकते बंद
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेचे संपूर्ण देशामध्ये तीन लाखांपेक्षा अधिक ग्राहक असे आहेत की त्यांनी अद्याप पर्यंत बँक खात्याचे ई केवायसी केलेले नाही. जर तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या खात्याचे ई केवायसी केलेले नसेल तर ते 12 ऑगस्ट 2024 पर्यंत करून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचे खाते बंद केले जाणार हे मात्र निश्चित.
12 ऑगस्ट 2024 आहे ई केवायसीची शेवटची मुदत
पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असून संपूर्ण देशामध्ये या बँकेचे 19 कोटींपेक्षा जास्त खातेधारक आहे. यामध्ये तब्बल तीन लाख पेक्षा जास्त खातेधारकांनी आपली ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता पंजाब नॅशनल बँकेकडून सर्व अशा खातेदारांना 12 ऑगस्ट 2024 पर्यंत इ केवायसी करण्याची शेवटची मुदत दिली आहे व त्यानंतर मात्र जर ई केवायसी केले नाही तर अशा खातेधारकांचे खाते बंद केले जाणार आहे.
ग्राहकांच्या बँक खात्यांमधून कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार त्यांना करता येणार नाही. त्यामुळे ही समस्या टाळण्याकरिता ताबडतोब ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व बँकेच्या खातेधारकांना केवायसी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशाप्रकारे ग्राहकाने केवायसी अपडेट केले नाही तर बँक त्या खात्यातील सगळे व्यवहार थांबवू शकते. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने देखील अशा प्रकारचा निर्णय घेतला असून ज्या ग्राहकांनी ई केवायसी केली नसेल त्यांनी 12 ऑगस्टपर्यंत करून घेणे गरजेचे आहे.