शेतकरी मरण पावल्यानंतर आपण दिवसा लाईट देण्याचा विचार करणार आहात का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- बिबट्यामुळे भयभीत झालेल्या नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी ८ दिवसांच्या आत दिवसा वीज पुरवठा करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे जनआक्रोश आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नगर तालुका कार्यकारी अभियंता श्री.कोपनर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

या वेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे शेतकरी बांधव भयभीत झालेले असून त्याची रात्रीच्या वेळेस शेतात पाणी धरण्याची हिम्मत होत नाही, असे असताना देखील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा न करता रात्रीची वीज देऊन गैरसोय करण्याचे काम करत आहे.

या वेळी निवेदनात म्हटले आहे की, रात्रीची लाईट भेटत असल्या कारणामुळे इच्छा नसताना शेतकरी बांधवाना जीव मुठीत धरून रात्री शेतात पाणी धरण्यासाठी जाव लागत आहे. शेतात रात्रीच्या वेळी काम करत असताना न कळत काही दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ?

नुकत्याच पाथर्डी, आष्टी ई. ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्लाच्या बातम्या कानावर येत असताना आपला विभाग काय करत आहे ? अश्याच घटना तुम्ही नगर तालुक्यात घडण्याची वाट बघत आहात का ? अश्या एखाद्या घटनेत तालुक्यातील शेतकरी मरण पावल्यानंतर आपण दिवसा लाईट देण्याचा विचार करणार आहात का ?

तशी घटना घडल्यास आपल्यावर गुन्हा दाखल केला तर चालेल का ? असेही काही प्रश्नही या वेळी निवेदनाद्वारे विचारण्यात आली आहेत. सदर मागणीवर आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास भाजपा नगर तालुका तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत अत्यंत तीव्र स्वरूपाचे “जनआक्रोश आंदोलन” करेल असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24