अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील बनावट डिजेल व नाप्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापपर्यंत या डिजेल रॅकेटमधील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही.
या पूर्वीच्या नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहीती आहे. तरी यातील मुख्य सुत्रधारला त्वरीत अटक करण्यात यावे अशी मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील याच्याकडे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
यावेळी अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, राजेद्र उंडे, रविद्र म्हसे, जब्बार पठान, नयन शिंगे, अंकुश बरडे, सचिन म्हेत्रे, सुजय काळे, विनितराव ठसाळ, दिपक वागळे, नारायण धोगडे, नारायण धनवट, अजित दावकर, आदीसह शिष्टमंडळात उपस्थित होते. या नगर जिल्ह्यामध्ये डिजेल व नाप्ता भेसळीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे.
या रॅकेटला मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खुल्याआम बनावट डिजेल विक्री केली जात आहे. नाप्ता भेसळीचे यापूर्वीही सापडलेले आहे. मात्र या प्रकरणाचा तपास अजुनपर्यंत पूर्णत्वास गेलेला नाही. आता पुन्हा डिजेल भेसळीचे रॅकेट उजेडात आलेले आहे.
डिजेल भेसळीबाबत पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवस उलटले आहे. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणेतील मुख्य सुत्रधार व इतर आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. राजकीय दबावापोटी कारवाई विलंब होत असल्याचे दिसत आहे.
तरी या प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिजेल व नाप्ता भेसळीचा योग्य व निपक्ष तपास करून मुख्यसुत्रधारासह इतरसह आरोपींना अटक करण्यात यावे.
या प्रकरणामुळे नगर जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्यास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आवाज उठवला जाईल तसेच येथ्या १० दिवसात जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयासमोर उपोषणाला बसण्यात येईल.
असे निवेदन जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांना देण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी शिष्टमंडळात सागितले की या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल.
या प्रकरणाच्या तपासासाठी अजुन एका पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केले आहे. हा तपास निपक्षपाती चालू आहे असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved