द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांना अटक करा, पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एन आय ए अंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का एन आय ए अंतर्गत अटक करण्यात यावी,

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांचे नावे जाहीर करण्यात यावी,

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नावे जाहीर केली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

या द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. असेही शेवटी ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24