दिवाळी संपताच अहमदनगर जिल्ह्यात वाढले तब्बल ‘ इतके’ रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२४ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०१ आणि अँटीजेन चाचणीत १९६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ०१, राहुरी ०१, श्रीगोंदा ०४, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३६, अकोले ०५, जामखेड ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण २९, नेवासा ०१, पारनेर ०३,

पाथर्डी १४, राहाता ०५, राहुरी १५, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०३, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १९६ जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, अकोले २५, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १५, नेवासा ११, पारनेर ११, पाथर्डी २२, राहाता २३, राहुरी ०८, संगमनेर ३७, शेवगाव १४, श्रीगोंदा ०४,

श्रीरामपूर १६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४५, अकोले २९, जामखेड ०५, कर्जत ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रा.१८,

नेवासा १५, पारनेर १५, पाथर्डी ३२, राहाता ११, राहुरी ४४, संगमनेर २८, शेवगाव ११, श्रीगोंदा ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५७९६४

उपचार सुरू असलेले रूग्ण: १२०७

मृत्यू:८९९

एकूण रूग्ण संख्या:६००७०

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24