मनसेच्या नितीन भुतारे यांनी ईशारा देताच 10 दिवसात महानगरपलिकेने केले काम चालु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने लोखंडी पुलशेजारील काम तातडीने पुर्ण करावे असे निवेदन वारंवार देऊन सुध्दा महानगरपालिका सदर पुलाचे काम पुर्ण करत नव्हते.

नविन पुलावर विघुत प्रकाशाचे खांब लावण्याचे बाकी होते. स्मशानभुमी कडे जाणार रस्ता अतिशय खराब चिखलाचे साम्राज्य झाले असल्यामुळे त्या रस्त्यावरुन अंत्यविधीला जाने कठीण झाले होते.

नवीन पुलाखाली जमा झालेल्या मातीच्या भरावा मुळे नदीला आलेल्या पाण्याचा निचरा होत नव्हता पानी वाहण्यास अडथळा निर्मान होत होता, नवीन पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे साईड कठडेच्या काम अपुर्न होते.

त्यामुळे नवीन पुलावर लाईट नसल्यामुळे अपघात घडण्याचि भिती अधिक असल्यामुळे 4 वर्ष होऊन देखील सदर ठेकेदार काम पुर्ण करताना दिसत नव्हते.

त्यामुळे 28 सप्टेंबर 2020 रोजी मनसेच्या वतीने लोखंडी पुला शेजारील नविन पुलाचे काम 15 दिवसात पुर्ण नाही झाले तर मनसेचे कार्यकर्ते,

पदाधिकारी संबधित ठेकेदार व महानगरपालिका अधिकारी यांना पुलावर बांधुन ठेवणार असा ईशारामनसेचे नितीन भुतारे यानी दिला होता.

हा ईशारा देताच महानगरपालिकेने स्मशानभुमीकडे जाणार्या रोड चे कॉंक्रीटकरनाचे काम हाती घेतले असुन. पुलाचे सर्व काम 15 दिवसात पुर्ण असे असे आश्वासन महानगरपालिकेच्या वतीने मनसेला देण्यात आले

सदर कामाची पाहणी करण्याकरिता मनसेच्या पदाधिकारी याना महानगरपालिकेच्या वतीने बोलविण्यात आले. असता सदर पाहणी करतांना महानगरपालिकेचे शहर कनिष्ठ अभियंता निंबाळकर साहेब,

मनसेचे नितीन भुतारे, जिल्हा अध्यक्ष्य सचिन डफळ अमोल बोरुडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.स्थनिक शिवसेनेचे नगरसेवक दिपक खैरे यांचे सुध्दा या कामाकरीता सहकार्य लाभले

सदर काम पुर्ण झाल्यावर मनसेच्या वतीने महानगरपालिकेतील पदाधिकारी यांचा मनसे सत्कार करनार असलयाचे नितीन भुतारे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24